💠Mpsc ला इंग्लिश चा संबंध येतो तो मुख्य परीक्षेला.(वनसेवा परीक्षेला केवळ पूर्व ला).येथे संयुक्त गट ब परीक्षेचा विचार करूयात कारण याचा अभ्यास करणारे जास्त जण असतात आणि इंग्रजीची भीती पण यांनाच जास्त असते. या परिक्षेत इंग्रजी चे प्रश्न असतात 30. मग आपण विचार करतो कि 30 प्रश्न म्हणजे खूपच झाले यासाठी क्लास केलाच पाहिजे. काही जण तर आपण कोणती परीक्षा देणार आहे त्यात इंग्रजी आहे का आणि किती मार्क्स ला आहे याचा कशाचाही विचार न करता केवळ बाकीचे विद्यार्थी क्लास करत आहेत हे पाहून तेही जॉईन करतात.(होऊदेत खर्च post मिळाल्यावर छापू नंतर याविचाराने). इथे आपण थोडा डोक्याला ताण देऊन मागील वर्षाचे पेपर पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल कि 30 प्रश्नांनपैकी 5 प्रश्न हे passege वर असतात म्हणजे प्रश्न आणि उत्तरे एकाच ठिकाणी आता या 5 प्रश्नांसाठी क्लास लावण्याची गरज आहे का तर नाही. राहिले 25 प्रश्न, यातील किमान 10 प्रश्न हे vocab वर असतात vocab म्हणजे मराठीत सांगायचे झाल्यास समानार्थी, विरुदार्थी, अनेक शब्दाबद्दल एक शब्द, म्हणी.... म्हणजे या सर्वांसाठी पाठांतराची गरज आहे concept ची नाही ज्याचा जास्त पाठांतर त्याचे हे प्रश्न जास्तीतजास्त बरोबर येतील. (यातील बरेचसे vocab मागील प्रश्नपत्रिकेतून रिपीट होतात)म्हणजे पुन्हा या प्रश्नांसाठी क्लास ची गरज नाही. आता राहिले 15 प्रश्न हे असतात ग्रामर वर यातील 5 प्रश्न हे easy level चे असतात म्हणजे आपण जे आजपर्यंत शालेय इंग्रजी शिकत आलोय त्यावरते हे प्रश्न सहज सुटतात. राहिलेल्या 10 प्रश्नातील 5 प्रश्न सोडविण्यासाठी तुम्हांला थोडे परिश्रम करावे लागतील जर एक english चे पुस्तक तुम्ही किमान 3 वेळा वाचल तर या प्रश्नातूनही तुम्ही वाचाल. जे क्लास लावतात त्यांना फायदा झालाच तर फक्त या 5 प्रश्नांसाठी होईल.आता मग या 5 प्रश्नांसाठी 3 महिन्यांचा क्लास लावणार का?आता राहिले शेवटचे 5 प्रश्न तर हे प्रश्न असे असतात कि आयोगाला यात तुम्हाला फसवायचेच आहे आणि ते फसवतेही हे प्रश्न luck वर असतात असा म्हटलं तरी चालेल(काही जण म्हणतील असे काय अवघड असणार आहेत क्लास लावून सुटतील हे पण प्रश्न, एक लक्षात घ्या राज्यघटनेसारख्या सोप्या आणि केवळ एक पुस्तक असून त्यातूनच प्रश्न येऊन पण आपण त्यात पैकी च्या पैकी मार्क्स पाडू शकत नाही कारण येथे आपला अभ्यास कमी पडत नाही तर हे प्रश्न आयोगाचे असतात आणि ते घरी जाऊन सोडवायचे असतात) किंवा या प्रश्नांन पर्यंत आपण पोहचतही नाही म्हणजे आपण पेपर solve करताना आधी मराठी आणि बाकीचे प्रश्न असे 70 प्रश्न सोडवतो आणि शेवटी इंग्रजी सोडवतो म्हणजे वेळेआभावी काही प्रश्न सोडवायचे राहिले तर ते इंग्रजीचे राहतात आणि हेच 5 अवघड राहतात.(ज्यांनी याआधी मुख्य परीक्षा दिलीये त्यांना हे चांगलेच माहित आहे). तर शेवटी सांगायचा मुद्दा हाच कि केवळ 5 प्रश्नांन साठी तुम्ही क्लास लावून वेळ आणि पैसा घालवू नका तेवढ्या वेळात vocab छान करा एकच पुस्तक जास्त वेळा वाचा. या विषयाची तुमच्या मनातील भीती गेली असेल अशी आशा करतो भेटूयात पुढील लेखात. धन्यवाद.🙏
✏️ लेखक - सुरज
"Hardwork on your smartness"
👉Join us on Telegram
No comments:
Post a Comment