💠आयोगाने संयुक्त मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदलून विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडविण्याच्या स्पीड ला जास्त महत्व दिले आहे.
ते कसे तर पहा याआधी मुख्य परीक्षा 200 मार्क्स 200 प्रश्न असे आता 400 मार्क्स 200 प्रश्न म्हणजेच 1प्रश्न 2 मार्क्स ला. या आधी 1 प्रश्न 1 मार्क ला असे. येथे 1 प्रश्न 2 मार्क्स ला ठेवला किंवा 5 मार्क्स ला तरी काही फरक पडत नाही फरक तेंव्हाच पडतो जेंव्हा नेगेटिव्ह मार्किंग मध्ये बदल केला जातो. याआधी नेगेटिव्ह मार्किंग होंते 1/4 आणि नवीन पॅटर्न नुसार पण ते 1/4 एवढेच आहे.सामान्यपणे पाहिल तर यावरून आपण असेच म्हणू कि आयोगाला काही कळत नाही या पॅटर्न ने काहीच फरक पडणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या जेवढ पवार साहेबांच्या मनात काय आहे ते समजून घेणं अवघड तेव्हडच आयोगाच्या मनात काय ते समजून घेणं अवघड आहे. इथे याप्रकारे पॅटर्न बदलून आयोगाने काय साध्य केल आहे तर पहा आयोगाने 1 प्रश्न आता 2 मार्क्स ला केला आहे म्हणजेच पूर्वीच्या सारखे oneliner प्रश्न आता खूप कमी दिसतील प्रश्न हे multiple उत्तराचे असतील उदाहरण पाहू ASO मुख्य परीक्षा 2019 ला एक प्रश्न विचारला होता. खालील कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे?
अ)मांजरा ब)शिवना क)दुधना ड)साबरी हा प्रश्न होता 1 मार्क ला आता जर हाच प्रश्न 2 मार्क्स ला करायचा असेल तर आयोग अश्या पद्धतीने विचारू शकेल
अ)मांजरा ही गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे.
ब)ती परभणी येथे गोदावरीला मिळते.
क)उजव्या बाजूने मिळणारी एकमेव नदी आहे.
Option 1)केवळ अ बरोबर
2)केवळ ब व क बरोबर
3)केवळ अ व ब बरोबर
4) वरील पैकी नाही
खरी गंम्मत तर येथे आहे कि आयोगाने वेळेत बदल केला नाहीये म्हणजे दोन्ही पेपर ला 1-1 तास असाच आहे. आता तुम्हीच पहा वरील 1 मार्क्स वाला प्रश्न वाचायला किती वेळ लागतो आणि 2 मार्क्स वाला वाचायला किती. ज्यांनी कोणी याआधी मुख्य परीक्षा दिलीये त्यांना चांगलेच माहितीये याआधी oneliner प्रश्न असूनही पेपर वेळेत सोडविण्यासाठी किती तारेवरची कसरत करायला लागते आणि आता तर 2 मार्क्स वाले प्रश्न आणि वेळ तर तेवढाच. एव्हाना तुम्हाला समजलेच असेल कि आयोगाने असा पॅटर्न change करून काय साध्य केले तर वेळ साध्य केला. आयोगाला तुमच्याकडून कमी वेळेत जास्त प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. म्हणजेच कमी वेळात जास्त काम करून देणारे अधिकारी आयोगाला पाहिजे आहेत. भेटूयात पुढील लेखात. धन्यवाद🙏
✏️ लेखक - सुरज
"Hardwork on your smartness"
जबरदस्त माहिती!
ReplyDelete