Wednesday, 25 November 2020

Mpsc करू इच्छिणाऱ्या नवीन मुलांसाठी काही सल्ले : भाग 1


💠Mpsc करू इच्छिणाऱ्या नवीन मुलांसाठी काही सल्ले : भाग 1

✍ सुरज देवकर

1) Graduation नंतर postgraduation ला admission घेऊन ठेवावे.(External असेल तरी चालेल).
2)अभ्यासाला किमान शेवटच्या वर्षापासून सुरुवात करावी.आधी केल्यास उत्तमच.
3)पुस्तके घेण्याची अथवा अभ्यासाची खूप घाई करू नये. आधी Mpsc म्हणजे काय हे नीट समजून घ्यावे.
4)सुरवातीच्या किमान 6 महिने ज्या ठिकाणी जास्त मुले mpsc करतात त्या ठिकाणी राहावे.जास्तीत जास्त Seniour मुलांच्या संपर्कात राहावे.
5)भूगोल,इतिहास,विज्ञान या विषयांची सुरवातीला Reference बुक घेऊ नये नाहीतर शालेय पुस्तके दुर्लक्षित होतील.या  विषयांना सर्वात महत्वाची शालेय पुस्तकेच आहेत.
6)वाचताना राज्यघटना विषयाची कोणतीही कलमे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नये.नाहीतर सतत लक्ष विचलित होत राहील.जश्या तुमच्या Revision वाढत जातील तशी कलमे आपोआप लक्षात राहतील. कलमांवर जास्तीत जास्त 2 प्रश्न पडतील तेही पडले तर त्यामुळे याचा जास्त टेन्शन घेऊ नये.
7)अर्थशास्त्र विषयाच्या जास्त खोलात जाण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर नेहमी confusion होत राहील.जेवढ परीक्षेला आवश्यक आहे तेवढच करावे.
8)अंकगणित/बुद्धिमत्ता या विषयासाठी IBPS/SSC exam साठी असणारे class लावावेत.
9)तुम्ही या क्षेत्रात ज्यांना follow करणार आहात त्यांची संख्या अगदी मोजकी असावी.
10)सुरवातीला आज मी किती वेळ अभ्यास केला यापेक्षा आज मला किती टॉपिक समजले यावर भर द्या.
11)किमान 2 reading झाल्याशिवाय नोट्स काढू नका.
12)तुम्ही अभ्यासातील 40% वेळ हा मागील प्रश्नपत्रिका Analysis करण्यासाठी द्यायला हवा.
13) मला पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास होयचीच आहे असे सतत म्हणून स्वतःवर Pressure create करून घेऊ नका.Relax मध्ये अभ्यास करा.
14) सुरवातीच्या 6 महिने केवळ जास्त अभ्यासाची गरज आहे.त्यानंतर जॉब करत अभ्यास केला तरी चालेल.
15)सर्वात महत्वाचे,आपण कोणत्या परीक्षेचा अभ्यास करत आहात यापेक्षा आपण कोणत्या पोस्ट चा अभ्यास करत आहात हे स्वतः ला अगदी पक्के माहित असणे गरजेचे आहे.

भेटुयात भाग 2 मध्ये......

✍ सुरज देवकर 

No comments:

Post a Comment