Wednesday, 25 November 2020

नोव्हेंबर : महिना Mpsc च्या Planning चा....!!!



💠नोव्हेंबर : महिना Mpsc च्या Planning चा....!!

✍ Suraj Deokar

दरवर्षी सहसा नोव्हेंबर महिन्यापर्यंत Mpsc च्या मुख्य परीक्षा संपतात आणि पुन्हा Planning सुरू होते पुढील वर्षीच्या तयारीचे....
एप्रिल मे मध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षेला अंदाजे 3 लाख विद्यार्थी बसतात.त्यामधून Vacancy च्या 15 ते 16 पट विद्यार्थी मुख्य परीक्षेला घेतले जातात.म्हणजे जर राज्यसेवा/Combine च्या 100 जागा निघाल्या तर कितीही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील तरी त्यातील 1500 ते 1600 विद्यार्थीच मुख्य परीक्षेला पात्र ठरतात.जे मुख्य परीक्षेला पात्र ठरतात ते जोमाने मुख्य च्या तयारीला लागतात आणि जे पूर्व परीक्षा पास होऊ शकले नाहीत ते सहसा ज्या कोणत्या परीक्षा समोर असतील (banking/railway/ssc/महापरिक्षा) त्यांचा अभ्यास करतात...
ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सहसा Mpsc च्या मुख्य परीक्षा संपतात.जरी मुख्य परीक्षा दिली असेल तरी Mpsc मध्ये Result लागेपर्यंत यशाची हमी देता येत नसल्याने पुन्हा पुढील वर्षीच्या तयारीला लागावे लागते...त्यामुळे हे मुख्य परीक्षा दिलेले विद्यार्थी याच महिन्यात पुन्हा पुढील वर्षीचे Planning करू लागतात.तसेच जे विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होऊ शकले नव्हते आणि मधल्या काळात बाकीच्या परीक्षा देत होते ते December मध्ये पुढील वर्षीच्या परीक्षांचे Timetable येत असल्याने नोव्हेंबर महिन्यातच पुन्हा पुढील वर्षाचे Planning आखु लागतात.जरी नवीन वर्ष जानेवारीत चालू होत असेल तरी Mpsc चे नवीन वर्ष नोव्हेंबर मध्येच चालू होते अस म्हणता येईल...म्हणजेच आता आपले नविन वर्ष सुरू झाले आहे आपल्यासाठी Mpsc चे 2020 हे वर्ष संपले आहे आणि नवीन 2021 वर्ष सुरू झाले आहे त्यामुळे मागील वर्षीचा विचार न करता पुन्हा सर्व गोष्टींची नव्याने मांडणी करा,आपल्याला कोणती पोस्ट मिळवायची आहे, त्यासाठी कोणते साहित्य लागेल,अभ्यास कसा करावा लागेल, कोणाच मार्गदर्शन घ्याव,मानसिकता कशी ठेवावी लागेल यासर्व गोष्टी याच महिन्यात clear करा म्हणजे एकदा पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली की या गोष्टी मध्ये नाही येणार...
लॉकडाऊन मध्ये बाकी मुलांचा माझ्यापेक्षा जास्त अभ्यास झाला असेल  याच टेन्शन घेऊ नका..कारण Mpsc मध्ये किती अभ्यास करता यापेक्षा काय आणि कसा अभ्यास करता याला जास्त महत्त्व आहे.केवळ जास्त अभ्यासानेच पास होता आल असत तर First attempt मध्ये कोणी पासच झाल नसत...
जर मी परीक्षा पास नाही झालो तर काय करायचं याचही planning केलेल असाव म्हणजे पुन्हा दुःखामध्ये 2 महिने वाया जाणार नाहीत.
पेपर झाले नाहीत याचं वाईट वाटून घेऊ नका कारण जर या काळात पेपर झाले असते तर कदाचित lockdown मुळे अभ्यासात खंड पडलेल्या खूप मुलांची एवढी मोठी ad हातातून गेली असती.
आता सर्वांच्या आवडीचा प्रश्न म्हणजे पेपर कधी होणार ? कदाचित या प्रश्नाचं उत्तर या वेळी तुम्हाला आयोगही नाही देऊ शकणार...

एक मात्र नक्की की पेपर हे होणारच तेही एप्रिल - मे अथवा त्याआधी...!!! धन्यवाद🙏

" सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा "

✍ सुरज देवकर

No comments:

Post a Comment