Monday, 3 August 2020

माझाअनुभव - सुरज देवकर



💠माझाअनुभव - सुरज देवकर

Mpsc मधील माझा एक अनुभव आपल्याशी share करत आहे बारकाईने वाचा नक्कीच खूप काही शिकाल यातून.(अनुभव सांगताना काही गोष्टी आयोगप्रमाणेच गोपनीय ठेवत आहे)

आपल्या प्रत्येकाचा मुख्य 5 विषयांपैकी एक विषय हा नावडता असतोच तसाच माझाही होता.भूगोल,हा माझा नावडता विषय असल्याने त्याकडे खूप दुर्लक्ष करायचो बाकी विषयांना 95% वेळ देत आणि 5% भूगोल या विषयाला.जेंव्हा पूर्व परीक्षा होयची त्यावेळी cutoff पेक्षा 7-8 मार्क्स कमी पडायचे पण हे कमी पडलेले मार्क्स भूगोल चा अभ्यास करत नाही म्हणून कमी पडले हे कधी मान्य नाही करायचो दुसऱ्याच विषयाचा अभ्यास कमी पडला असेल म्हणून मार्क्स कमी मिळाले असे मनाला सांगायचो.परंतु सतत असा 7-8 मार्क्स कमी येतायत हे समजल्यावर एकदा शांत बसून माझ्या झालेल्या पेपर आणि मार्क्स चा परीक्षण केला तेंव्हा समजल की भूगोल विषयाला आपल्याला average पेक्षाही कमी गुण मिळत आहेत(4-5).तेंव्हा ठरवलं की आता यापुढे हा विषय कितीही नावडता असला तरी अभ्यास करायचा,जास्त वेळ करायचा,जो पर्यंत आत्मविश्वास येत नाही तो पर्यंत करायचा मग भलेही बाकी विषय थोडे मागे पडले तरी चालतील.मग ठरल 5% चा वेळ वाढवून 40% पर्यंत नेला.पूर्व चा पेपर झाला.निकाल लागला.Cutoff (open) 56 लागला...मला मिळाले होते..62(open category)...यातील भूगोल विषयात....15 पैकी 13 मिळाले 1प्रश्न आयोगाने रद्द केला... एक चुकला...धन्यवाद

2 comments: