आयोग तुमचा mindset, विचारकरण्याची पद्धत चांगलाच ओळखून आहे.त्यामुळेच तर एका विशिष्ठ मर्यादेपेक्षा जास्त मार्क्स मुलांना पडत नाहीत.संयुक्त पूर्व परीक्षेचा विचार केल्यास जर 100 प्रश्न आहेत तर 70 ते 80 मार्क्स का पडत नाहीत topper हा देखील 75 च्या आतच असतो हे limit कधीच cross का होत नाही याचे कारण म्हणजे आयोग तुमचा mindset चांगलाच ओळखून आहे.तो तुम्हाला एक लिमिट पेक्षा पुढे जाऊ देत नाही.मग हे आयोगाला कसे काय जमते ? आयोग 25-30 प्रश्न खूप अवघड काढते काय ? तर अस अवघड वगैरे काही नसतं.हो काही प्रश्न नक्कीच अवघड असतीलही परंतु topper जर 70 चा आला म्हणजे 30 प्रश्न आयोगाने अवघड काढले अस होत नाही.यातील 5 ते 7 प्रश्न अवघड असतीलही परंतु राहिलेले प्रश्नांमध्ये आयोग तुम्हाला फसविते, चुकीचे उत्तर लिहायला मजबूर करते,आणि सगळेच जण आयोगाच्या या जाळ्यात नेहमी सापडत असतात कारण आयोग तुम्हाला चांगलाच ओळखून आहे.जर तुम्ही पूर्व परीक्षेत 70 मार्क्स मिळालेल्या topper चे अभिनंदन केले तर तो म्हणेल "शीट यार आणखी मार्क्स मिळाले असते पण खूप silly mistecks झाल्या " खरे पाहिले तर त्या silly misteks त्याच्याकडून घडून याव्यात अशाच पद्धतीने आयोगाने प्रश्न सेट केलेले असतात.म्हणजेच प्रश्न हे अवघड नसतात जे प्रश्न चुकतात ते तुमच्याकडून आयोगाने चुकवून घेतलेले असतात आणि अशाप्रकारे topper ला ही एका विशिष्ठ मर्यादे पलीकडे आयोग जाऊ देत नाही.एक उदाहरण पाहुयात म्हणजे कळेल की मला काय म्हणायचे आहे.(आयोग खालील प्रकारचे प्रश्न विचारत नाही परंतु फसविण्याचा उद्देश या प्रकारचाच असतो)
प्रश्न : खालील कोणत्या महिन्यात 29 दिवस असतात ?
1)फेबुवारी
2)जानेवारी
3)नोव्हेंबर
4)वरील सर्व
पेपर मध्ये वेळेची खूप कमतरता असल्याने आपण जास्तीत जास्त लवकर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असतो तशाच प्रकारे वरील प्रश्न सोडवायला गेल्यास पर्याय 1 वाचला की कळेल उत्तर फेब्रुवारी हेच आहे बाकी पर्याय न वाचता आपण 1 हे उत्तर टिक करू आणि खूप जण हेच करतील.परंतु पर्याय 4 वाचला की समजेल 29 दिवस हे जानेवारी(29+2=31) आणि नोव्हेंबर( 29+1=30)या महिन्यात देखील आहेत .म्हणजे प्रश्न सोपा असूनही एकाच वेळी अनेकजण चुकले,नव्हे आयोगाने चकविले.
आयोगाचा mindset आपण पूर्णतः तर नाही ओळखू शकत परंतु थोडा जरी ओळखता आला तरीही आपल्या खूप चूका कमी होतील आणि भरपूर मार्क्स वाढतील. आयोगाचा mindset ओळखण्याचा एकच साधन आपल्याकडे आहे ते म्हणजे झालेले पेपर्स.धन्यवाद🙏
✍लेखक - सुरज देवकर
Hiohoo
ReplyDeleteHiohoo
ReplyDeleteQuestions analisys important
ReplyDeleteआयोगाचा अचूक अंदाज बद्दल छान सांगितले
ReplyDeleteKya Baat hai sir..
ReplyDeleteNice blog.
Kya Bolti Public Quiz Answers