Saturday, 29 August 2020

MPSC करण्याचा द माही वे..!!



💠MPSC करण्याचा द माही वे..!!

महेंद्र सिंग धोनी म्हटलं की डोळ्यासमोर काय येत...त्याची शतके ? त्याची अर्धशतके ? त्याचे स्वतःचे रेकॉर्ड ? नाही..!...मग ?....त्याचा Attitude, आत्मविश्वास, चाणाक्षपणा,शांत स्वभाव,संघभावना,खिळाडूंवृत्ती.....जर क्रिकेट मधील एखादे Ranking वरील गुणांच्या आधारे करायचा झाल्यास सर्वात प्रथम धोनीचाच क्रमांक लागेल यात शंका नाही. 
स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना धोनीकडून खरच खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत.ज्याला क्रिकेट मधील कोणत्याही godfather कडून training मिळाले नाही,नाकी खेळण्यासाठी कोणते उच्चतम source रांची सारख्या मागास भागात उपलब्ध होते तरीही तो किमान आवश्यक साहित्य आणि अत्यावश्यक आत्मविश्वास या जोरावर successful झाला. मग स्पर्धा परीक्षेतही एखाद्याला success मिळविण्यासाठी मोठा godfather(नामवंत क्लास),सर्व resorces(मला लायब्ररीच पाहिजे,पुण्यातच अभ्यासाला गेले पाहिजे,अभ्यासाला special रूम पाहिजे) उपलब्ध असलेच पाहिजेत अस काही नाही.
धोनी ज्या वेळी टीम मध्ये आला त्यावेळी सचिन,सेहवाग,गांगुली यांसारखी बरीच मोठी नावे टीम मध्ये होती आपण यांच्यापुढे कसे टिकू, आपण खूप छोट्या गावातून आलोय,आपल्याला यांच्यात मिक्स होता येईल का असा कोणताही विचार न करता किंवा न्यूनगंड न बाळगता,त्यांना respect देऊन पण स्वतःचा आत्मविश्वास कमी होईल एवढ डोक्यावर न चढवता स्वतःच वेगळ स्थान निर्माण केलं.Mpsc चा अभ्यास सुरू करणाऱ्या खूप साऱ्या नवीन विद्यार्थाना ही अशाच समस्यांना सामोरे जावे लागते.मी तर नवीन आहे बाकी अनुभवी मुलांचा किती जास्त अभ्यास झाला असेल ,कितीतरी Revision झाल्या असतील,माझे शिक्षण तर खेड्यात झाले मी यांच्यापुढे टिकेल का,मला इंग्रजी चा पेपर जमेल का,त्या मुलाचा अभ्यास खूप छान आहे तो ग्रेट आहे त्याचा अभ्यास पाहून माझा आत्मविश्वास कमी होतो,अश्या अनेक समस्या,न्यूनगंड  मुलांच्यात असतो.विचार करा धोनी नवीन असताना त्याच्यासमोरही अशाच अनेक समस्या असतील परंतु त्याने स्वतःच्या आत्मिश्वासाच्या जोरावर या सर्वांन मधून मार्ग काढला.लक्षात घ्या एखादा चांगला प्लेयर खराब बॉल ला आऊट होऊ शकतो आणि एखादा खराब प्लेअर चांगला बॉल सिक्स ही  मारू शकतो.Mpsc चे ही तसेच आहे एखादा खूप जास्त अभ्यास असणारा मुलगा परीक्षेत सोपा प्रश्न चुकवू शकतो आणि त्याच्यापेक्षा कमी अभ्यास असणारा मुलगा अवघड प्रश्न बरोबर आणू शकतो.
धोनी एखादी match हरला म्हणून कधी खूपच जास्त नाराज झाला अथवा एखादी जिंकल्यामुळे खूपच खुश झाला अस कधी घडत नाही कारण त्याच्या दृष्टीने हारने अथवा जिंकणे जास्त महत्वाचे नसून 'खेळणे' महत्वाचे आहे.अमुक 2007 ला एखादी match इंडिया जिंकला अथवा अमुक 2006 ला एखादी match हरला याचा आजच्या दिवशी ना मोठा आनंद आहे नि मोठे दुःख आहे.त्यावेळी तुम्ही पूर्ण क्षमतेने आणि आनंदाने खेळला का याला महत्व आहे .त्या वेळच्या हार/जिंकण्याचा आजच्या दिवसावर काही फरक पडणार नाहीये आज पुन्हा नवीन आवाहने समोर आहेत त्यात तुम्हाला अपयश/यश आले याला जास्त महत्व नाहीये तुम्ही त्या आवाहनाला सामोरे कसे जाणार आहेत हे महत्वाचे आहे.
प्रत्येकाला एक विशिष्ट वेळी निवृत्त व्हावे लागते तसा धोनीही झाला.निवृत्त होण्यासाठी कोणी कितीही टीका केली कितीही सल्ले दिले तरी त्याकडे दुर्लक्ष करून केंव्हा निवृत्त होयचे हे मनात नक्की ठरवले होते आणि खरच योग्य वेळी निवृत्त झाला.क्रिकेट हेच आयुष्य नाहीये हे त्याला चांगलेच माहीत आहे.विद्यार्थानीही आपण स्वतःच ठरवायचे आहे की स्पर्धा परीक्षेतून बाहेर पडण्याची आपली योग्य वेळ कोणती आहे मग कोणी कितीही सल्ले देवोत. परंतु एक मात्र नक्की लक्षात ठेवावे की स्पर्धा परीक्षा म्हणजेच आयुष्य नाहीये.

"जेंव्हा मला मरण्यासाठी काही क्षण उरले असतील तेंव्हा मला धोनीने वर्ल्ड कप मध्ये शेवटच्या बॉल वरते मारलेला six पाहायला आवडेल" - सुनील गावस्कर

एवढा लेख लिहिण्याचा प्रपंच याच साठी की क्रिकेट आणि राजकारण यांचा संबंध घेऊन गोष्टी सांगितल्यास आपल्याला लवकर समजतात.धन्यवाद🙏

सुरज देवकर 

6 comments: