जगातील succesful व्यक्ती कोण ? असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर क्षणात हजारो नावे आणि चेहरे तुमच्या समोर येतील आणि unsuccessful व्यक्ती कोण असे विचारले तर तुमच्यामनात फक्त तुमचेच नाव येईल बाकी कोणाचे येणार नाही. असे का ? कारण आपण स्वतःला केवळ MPSC च्या दृष्टीकोनातून पाहत असतो.मी जर MPSC पास झालो तर मी succesful आणि नाही झालो तर unsuccessful. बाकी आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी असतात पण आपण त्यात आपले success unsucces शोधण्यात वेळ घालवत नाही.खरच mpsc मध्ये पास होणारा succesful आणि आपण unsuccesful असतो का? Psi/Sti मध्ये राज्यात प्रथम येणार्याला sucessful म्हणणार असाल तर त्याच विद्यार्थाने राज्यसेवा पण दिली असणारच पण त्यात त्याला यश आले नाही मग त्याला unsuccesful म्हणार का?राज्यसेवेत पास झालेल्याला successful म्हणार असाल तर तो राज्यात पाहिला नाही येऊ शकला म्ह्णून त्याला unsuccesful म्हणार का?राज्यसेवेत राज्यात पहिला आलेल्याला succesful म्हणणार असाल तर त्याच वर्षी त्याने दिलेल्या upsc परीक्षेत यश आले नाही मग त्याला unsucessful म्हणणार का? Upsc मध्ये pass झालेल्याला sucessful म्हणाल तर तो पहिला नाही येऊ शकला म्हणून त्यालाच unsucessful म्हणाल का?Upsc मध्ये पहिला आलेल्याला sucessful म्हणाल तर तोच विद्यार्थी पहिल्याच attempt मध्ये पहिला नाही आला म्हणून त्याला unsucesful म्हणाल का ?सध्याचे राष्ट्रपती हे देशातील सर्वोच पदावर आहेत त्यामुळे त्यांना sucessful म्हणत असाल तर राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय 35 लागते मग ते 35 व्या वर्षीच का नाही राष्ट्रपती होऊ शकले म्हणून मग त्यांना unsuccesful म्हणाल का?.........
जे पक्ष सत्तेत असतात ते नेहमी केलेल्या कामातील positive गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न करत असतात व जे विरोधी पक्षात असतात ते नेहमी एखाद्या गोष्टीतील negative गोस्ट दाखविण्याचा प्रयत्न करत असतात....केवळ अभ्यास करतानाच नाही तर आयुष्यातही आपल्याला प्रत्येक वेळी सत्तेत असलेल्या पक्षाप्रमाने वागायचे आहे प्रत्येक गोष्टीतील positive गोष्टी पहायच्या आहेत......जगात म्हणाल तर सगळेच succesful आहेत म्हणाल तर सगळेच unsuccesful आहेत...तुमचा पाहण्याचा दृष्टीकोन ठरवतो की एखादा succesful आहे की unsuccesful....कोहली ने स्ट्रेट ड्राईव्ह ला फोर मारल्याचे पाहून खुश होयचे की अरे यार सिक्स मारायला हवा होता हा विचार करून दुःखी होयचे हे आपण स्वतः ठरवावे..... जगात आलेली प्रत्येक गोस्ट ही succesful च आहे आपण आपल्या विचाराने तिला unsuccesful बनवत असतो...साधा दगड हा सुद्धा succesful आहे कारण अजून त्याची माती झालेली नाहीये.....धन्यवाद🙏
✍लेखक - सुरज देवकर
Thanks sharing expirance
ReplyDeleteलेख वाचून प्रोत्साहन मिळाले
ReplyDelete