Monday, 27 April 2020

या वर्षी MPSC चे पेपर होणार का? हे वाचा उत्तर तुम्हाला स्वतःलाच मिळेल... !!!

💠ही पोस्ट मी कोणालाही नेगेटिव्ह अथवा पॉसिटीव्ह करण्यासाठी लिहीत नाहीये मी जी परिस्तिथी आहे ती तुमच्या समोर मांडणार आहे त्यावरून तुम्ही स्वतःच ठरवू शकाल नेमक्या परीक्षा कधी होऊ शकतात ते. बरेच लोक (स्पर्धा परीक्षेचा धंदा करणारे) तुम्हाला भोळा आशावाद दाखवत आहेत कि अभ्यास करा परीक्षा लगेच एक दोन महिन्यात होतील आणि तुम्हीपण त्यांनी आपल्याला पॉसिटीव्हिटी दिली म्हणून त्यांची वाहवा करत आहात ते तसे करणारच कारण शेवटी त्यांचा धंदा तुमच्यावर अवलंबून आहे. या मध्ये अभ्यास करत राहण्याबाबत दुमत नाहीये परंतु अभ्यासाला दिशा देण्याबाबत परीक्षा कधी होऊ शकतात हे माहित असणं महत्वाच आहे. त्यासाठी काही गोष्टी सांगत आहे त्यावरून तुमची सद्सद्विवेकबुद्धी वापरून ठरवा कि परीक्षा कधी होतील ते.
✏️आजची परिस्तिथी पाहता lockdown हा किमान जून संपेपर्यंत तरी थोड्या थोड्या सवलती देऊन चालूच राहील असे वाटते. 
✏️इथे एक गोष्ट लक्षात घ्या कि lockdown आणि जिल्हाबंदी या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत lockdown शिथिल करणे अथवा निघणे म्हणजे जिल्हाबंधी संपणे असे नाही. 
✏️परीक्षा होण्यासाठी lockdown नाही तर जिल्हाबंदी उठणे आवश्यक आहे. 
✏️जिल्हाबंदी कधी उठणार तर पहा मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथे सर्वात जास्त विद्यार्थी परीक्षा देतात म्हणजे त्यांचे परीक्षा केंद्र हे जिल्हे असतात. आत्ता कोरोनाची सर्वात जास्त संख्या याच जिल्ह्यात आहे त्यामुळे यावरून एक गोष्ट तर नक्की होते कि जर टप्या टप्या ने जिल्हाबंधी उठवली तर सर्वात शेवट या जिल्ह्यातील उठेल. 
✏️परवाच उपमुख्यमंत्री नी आदेश दिले कि एपिडेमिक ऍक्ट 1897 नुसार जिल्हाधीकार्यांनी खासगी शाळा विलगीकरन कक्षासाठी ताब्यात घ्याव्यात म्हणजे तुमचे काही परीक्षा केंद्र यात जाऊ शकतात. 
✏️सर्वात महत्वाचे म्हणजे शासन अश्याच गोष्टी चालू करत आहे ज्यातून राज्याची अर्थव्यवस्था चालू राहावी व महसूल मिळेल  उदा. उदयोग वगैरे तर आपल्या परीक्षा घेणे म्हणजे आत्ता महसूल गोळा करण्यात हातभार लागणे असे नव्हे त्यामुळे अशा काळात परीक्षा घेण्यातून काहीच साध्य होणार नाहीये उलट जास्त नुकसान होऊ शकते. 
✏️काही मुलांना वाटेल कि जेथे करोना नाहीये त्या जिल्यात परीक्षा घ्यायला काय हरकत आहे परंतु जर समजा चंद्रपूर मध्ये करोना नाही मग जर तिथे परीक्षा केंद्र दिले तर विचार करा तेथील स्थानिक लोक याला विरोध करणार नाहीत का लोक बाहेरून येणार म्हटल्यावर. 
✏️उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पण नुकतेच वय मर्यादा वाढविण्याचे घोषित केले होंते त्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता कि शासनासाठी परीक्षेपेक्षा आरोग्य महत्वाचे आहे आणि ते असलेच पाहिजे. 
✏️तसेच जर परीक्षा लवकरच होणार असत्या तर पुण्यात जे विद्यार्थी अडकले आहेत त्यांना घरी पाठविण्यासाठी शासनाने प्रयत्नच नसते केले सांगितले असते कि तिथेच राहा परीक्षा लवकर होतील. 
✏️माझे मते  परीक्षा होण्यासाठी आधी lockdown निघावा लागेल म्हणजे जिल्ह्याअंतर्गत सर्व व्यवहार चालू होयला लागतील त्यानंतर टप्या टप्याने जिल्हाबंदी निघावी लागेल यातील सर्वात शेवटचा टप्पा पुणे मुंबई असेल त्यानंतरही social distansing वगैरे मास्क लावणे चालू ठेवावे लागेल एवढे सगळे करून परिस्तिथी पाहून मग परीक्षेचा विचार केला जाईल असे माझे मत आहे. यासाठी किती कालावधी लागेल हे तुम्हालापण चांगलेच ठाऊक आहे. 
✏️आता हा कालावधी किती असेल हे तुम्हाला कळलेच असेल . तर पुढील लेखात हा जो काही वेळ तुम्हाला मिळणार आहे त्यात कोणी कशाचा आणि कसा अभ्यास करावा तसेच plan B कसा तयार करावा हे सांगेल. (कोणावरही भोळा विश्वास ठेऊ नका माझ्यावरही  नको समोरचा जे काही सांगतो ते कशाच्या आधारावरते सांगतो ते पहा. धन्यवाद)
लेखक- सुरज (@mpscexpected )

2 comments:

  1. sir aata paper kadhi honar kahi lok nov dec madhe honar aahe as mhanat aahe he khar aahe ka sir

    ReplyDelete