💠Mpsc चे नवीन विद्यार्थी म्हणजे ऊर्जेने भरलेले अणूचे केंद्रक आहेत तर जुने विद्यार्थी म्हणजे अनुभवाने संपन्न असे पिंपळालाचे झाडच आहेत. मग विषय येतोकी mpsc च्या रणांगणात कोण जिंकणार ऊर्जा कि अनुभव तर याचा उत्तर असा आहे अनुभव योग्य वेळी वापरता अला तर अनुभव जिंकेल आणि ऊर्जेचा वापर जर योग्य दिशेने झाला तर ऊर्जा जिंकेल.
मी नवीन विद्यार्थी त्यांना म्हणेल ज्यांनी किमान एक राज्यसेवा पूर्व व एक संयुक्त पूर्व दिली आहे (ज्यांनी एकही परीक्षा दिली नाही ते पण यात येतात) आणि बाकी चे सर्व ज्यांनी एकापेक्षा जास्त परीक्षा दिल्या आहेत ते जुने विद्यार्थी असा मी वर्गीकरन करेल. नवीन विद्यार्थीचा प्लस पॉईंट हा आहे कि त्याच्यात खूप जास्त उर्जा आहे अभ्यास करण्याची. कोनतेही पुस्तक वाचताना त्यांना कंटाळा येणार नाहीये म्हणजेच ते अभ्यासातील सातत्य कायम ठेऊ शकतात. इथे तुम्हाला एका गोष्टीची कमी पडू शकते ती अनुभवाची कि नेमका आपण काय वाचला पाहिजे आणि परीक्षेतील pressure कसा हॅन्डल केला पाहिजे आणि परीक्षेतील silly mistek कश्या कमी केल्या पाहिजेत तर यावरते तुम्हाला काम करावा लागणार आहे वरील तीनही गोष्टी एकाच पद्धतीने कव्हर करता येतील ती म्हणजे प्रश्नसंच सोडवून.प्रश्नसंच टॉपिक नुसार सोडवावा. प्रश्नसंच सोडवून कसा फायदा होईल तर जेंव्हा एखादा टॉपिक वाचून त्यावरील प्रश्न सोडवता तेंव्हा आपण काय वाचतो आणि प्रश्न कशावरते पडतो हे तुम्हाला कळेल म्हणजेच काय वाचायचा हे कळत जाईल आणि सोडवताना नक्की silly mistek कशा होत आहेत हे पण कळेल एकंदरीतच यामुळे तुमचा प्रश्न सोडविण्याचा वेग वाढेल त्यामुळे परीक्षेत वेळ कमी आहे खूप प्रश्न राहिलेत हे pressure पण येणार नाही. एका दगडात 3 पक्षी मारणे यालाच म्हणतात. आता पाहू जुन्या विद्यार्थीनी काय केला पाहिजे तर तुम्ही वरील 3 पक्षी हे allready बऱ्यापैकी जखमी केलेच आहेत. तुम्हाला पुस्तके पहिली कि झोप येते revise करायलाही खूप बोर होंते माहितीये मला याचे कारण तेच तेच वाचणे नको वाटते तुमच्यात ऊर्जा आहे पण तुम्हाला ती जुने पुन्हा वाचताना निघून जाते. तर तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे ऊर्जा टिकवायची आहे त्यासाठी जे बेसिक आहे ते तर तुम्ही सर्व वाचलेच आहे आता मग नवीन वाचायला घ्या जसे कि इतिहासच जर गाठाळ वाचल असेल तर कठारे वाचा मॉडर्न इंडिया बिपीन चंद्र वाचा समाधान महाजन आधुनिक भारत वाचा म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन वाचतोय असाही वाटेल आणि कोणत्याही पुस्तकात 80% कन्टेन्ट सारखाच असतो त्यामुळे revision पण होऊन जाईल त्याचबरोबर प्रश्नसंच पण सोडवा पण तुम्ही टॉपिक नुसार न सोडवता random सोडावा म्हणजे कोणताही विषय कधीही सोडवा कारण तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला असल्याने प्रश्नवाचून उत्तर काढता येईल. पुढील लेखात आणखी काही टिप्स पाहू तोपर्यंत धन्यवाद. 🙏( लेख वाचत असाल तर प्रतिक्रिया कळवत चला )
✏️लेखक- सुरज
टेलिग्राम - https://t.me/mpscexpected
ब्लॉग - https://mpscexpected.blogspot.com
No comments:
Post a Comment