Saturday, 2 May 2020

राज्यघटनेच्या प्रेमात पडू नका... !!!

💠Mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर विचारले कि तुमच्या आवडता विषय कोणता तर 85% सांगतील राज्यघटना बाकी 10% भूगोल व उरलेले 5% इतर विषय. अस का तर विषय समजायला सोपा आहे इंटरेस्टिंग आहे आणि input output रेशिओ चांगला आहे म्हणजे कमी अभ्यासात जास्त मार्क्स. परंतु या विषयाचा अभ्यास करताना खूप मुले चुका करतात. त्यांचा असा आग्रहा असतो कि याविषयात पैकीच्या पैकी मार्क्स घेणार. परंतु जर मागील वर्षीचे पेपर नीट पाहिले तर असे लक्षात येते कि राज्यसेवेला पूर्व परिक्षेत 15-17 प्रश्न संयुक्त पूर्व गट ब आणि क ला 10 प्रश्न या विषयाचे येतात यातील 90% प्रश्न हे तुम्हांला कोणतेही extra efforts न देता आहे ते पुस्तक वाचून मिळवता येतात. मुलांना असा वाटतं कि उरलेले 10% पण मी बरोबरच आणणार मग सुरु होतात दिवस दिवस प्रत्येक टॉपिक वर मैफिली मुखमंत्री ठाकरे हे आमदार होणारच काही म्हणतात नाही मग त्यासाठी सभा बहाद्दर 1857 च्या काळातील पुस्तके दाखविणार कि बघा या कलमा नुसार होणार आमदार. काही जण म्हनणार नाही त्यात घटनादुरुस्ती झालीये वगैरे वगैरे. परिक्षेत प्रश्न येणार राज्यपाल नियूक्त किती सदस्य विधानपरिषदेवर असतात  मग सभा बहाद्दर म्हणार अरेच्या हे तर राहूनच गेला कि वाचायचा आणि प्रश्न चुकवून येणार. सांगायचा मुद्दा हा कि आयोगाला पूर्व परीक्षेला तुमच्याकडून राज्यघटनेचा बेसिक अभ्यास अपेक्षित आहे deep नाही तसा त्यांनी syllabus मध्ये पण दिला आहे.राज्यघटनेचा प्रत्येक प्रश्न मला आलाच पाहिजे यात काही अर्थ नाही यामागे पळण्यात तुमचा खूप वेळ खर्च होईल आणि वेळ जाऊनही काही श्यक्यता नाही कि सगळे बरोबर येतील. त्यामुळे मला कमी अभ्यासात कसे जास्त मार्क्स मिळवता येतील हे पाहिले पाहिजे आणि ते मिळवून देतो हा विषय फक्त आपण त्याला जास्त complicated बनवतो अधिकची माहिती घेण्याच्या प्रयत्नांतून. एक लक्षात घ्या जर आयोगाला वाटले कि तुमचा एखादा प्रश्न चुकवायचाच तर आयोग तो चुकवणाराच राज्यसेवेला एका पूर्व ला प्रश्न होता राज्यघटनेवर जेंव्हा सह्या होत होत्या त्यावेळी सभागृहाबाहेर पाऊस पडत होता का? असेल  तर तो अपशकुन कि शकुन होता? शोधा आता याचा उत्तर कोणत्या पुस्तकात आहे. तर ते कोणत्याही पुस्तकात नाही मिळणार ते शेखर कपूर यांच्या प्रधानमंत्री Tv series मध्ये आहे. या विषयात factual data खूप जास्त आहे कि जो परिक्षेत विचारला जातो त्यामुळे जास्तीत जास्त revision गरजेची आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक हा सारखा नाहीये कोणत्या टॉपिक च काय वाचायचा हे समजल पाहिजे. जसे कि प्रस्तावना ही शब्द न शब्द पाठ पाहिजेच यावरते एक प्रश्न असा विचारला होता कि प्रस्तावनेत खालील कोणता शब्द पहिल्यांदा येतो उत्तर होते न्याय. याउलट केंद्रीय दक्षता आयोग वगैरे जे टॉपिक असतात त्यात फक्त अध्यक्ष सदस्य कार्यकाळ, नेमणूक एवढेच करावे. परीक्षा दूर आहे म्हणून आपण सर्व टॉपिक मधील सर्व मुद्दे वाचतो. परंतु जेंव्हा पेपर असतात आणि revise करायचा असत तेंव्हा मात्र आपली तारांबळ उडते कि आधी एवढ सगळं वाचल आहे तर आता ते skip नाही करता येणार आणि वाचायच म्हटलं तर वेळ कमी पडणार अशी द्विधा मनस्तीती होते आणि अपयशाच्या पहिल्या पायरीची चाहूल लागते. त्यामुळे जे काही वाचायच आहे तेवडच मला same परीक्षेला revise करताना वाचायचा आहे अस ठरवून अभ्यास करा. शेवटी एक लक्षात घ्या आपल्याला एखाद्या परिक्षेत थोड्या मार्क्स ने अपयश येते तेंव्हा ते अवघड प्रश्न चुकल्याने येत नाही तर ते सोपे आणि आपल्याला येणारे प्रश्न चुकल्याने येते. (प्रयोग करून पहा जर याआधी तुमची पूर्व परीक्षा 2-3 मार्क्स ने गेली असेल तर पुन्हा एकदा पेपर पहा त्यात तुम्हाला समजेल कि हे 2-3 मार्क्स चे सोपे प्रश्न आपन चुकवून आलो. म्हणजेच अवघड प्रश्न चुकल्याने आपण नापास होत नाही तर सोपे चुकल्याने होतो. भेटूयात पुढील लेखात तोपर्यंत धन्यवाद. 🙏
✏️लेखक - सुरज (@mpscexpected )
टेलिग्राम - https://t.me/mpscexpected 
ब्लॉग -
https://mpscexpected.blogspot.com

No comments:

Post a Comment