💠 lockdown हा 31 मार्च पर्यंत घोषित झाला होता. बरेच विद्यार्थी हे 13-17 तारखेदरम्यान घरी परतले. म्हणजेच तुम्ही घरी येताना किमान 15 दिवस घरी थांबून अभ्यास करू हे ठरवून आलात. 15 दिवस अभ्यास म्हणजे किमान 2 विषयाचे तरी पुस्तके आणि चालू घडामोडी year book घेऊन गेले असाल, असायला पाहिजे. (रिकाम्या हाताने गेला असेल तर तुम्हाला 🙏). म्हणजेच 3 विषयाचे अभ्यास साहित्य तुमच्याकडे आहे.(मी इथे संयुक्त परीक्षे बद्दलच बोलत आहे कारण राज्यसेवा परीक्षा लवकर होती त्यामुळे राज्यसेवा करणारे सर्व पुस्तके घेऊनच गेले असतील अशी अपेक्षा करतो अथवा काहीजण गेले पण नसतील)आपल्याला अंकगणित/बुद्धिमत्ता सोडून विषय राहतात 6.म्हणजे तुमच्याकडे अजून जास्तीतजास्त 3 विषयाची पुस्तके नाहीत. तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो संयुक्त पूर्व पास होण्यासाठी 6 विषयाला केवळ 6 पुस्तके पुरून उरतात. यामद्धे मी सर्व विषयांची क्रमिक पुस्तके सोडून सांगत आहे कारण क्रमिक पुस्तके ही सर्वांनी वाचली असतीलच आणि वाचायलाच पाहिजे. म्हणजेच पूर्व परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला 6 reference बुक्स आणि क्रमिक पुस्तके लागणार आहेत. यातील सर्व क्रमिक पुस्तके pdf मध्ये online available आहेत. जी पुस्तके तुम्ही आणली नसतील त्याच्या नोट्स सर्व टेलिग्राम चॅनेल वर मिळत आहेत. म्हणजे तुमच्याकडे किमान पूर्व परीक्षा पास होण्याइतपत साहित्य आहे. शेवटी एक गोष्ट सांगतो आत्ता वर मी सांगितलेला साहित्य जवळ ठेवा (म्हणजे क्रमिक पुस्तके आणि प्रत्येक विषयाचे फक्त एकच पुस्तक) आणि गेल्यावेळेचा संयुक्त पूर्व चा पेपर घेऊन जे प्रश्न आले होते ते विषयानुसार त्यातून शोधा आणि गेल्यावेळचा cutoff पहा मग कळेल कि एवढ्याच पुस्तकात आपण सहज पास होत आहोत. एक लक्षात घ्या cutoff जर 50 असेल तर जसा 60 मार्क्स पडणारा पास असतो तसाच 51 पडणारा पण पास असतो. आपल्याला पूर्वला फक्त पास होयचा आहे topper नाही यायच आणि पास होण्यासाठी वर सांगितलेली पुस्तके sufficient आहेत. ज्यांच्याकडे सर्व पुस्तके असतील त्यांना पाडूद्यात किती जास्त पडायचेत तेवढे मार्क्स. मुख्य परीक्षेला जेंव्हा तुमच्याकडे येतील सर्व पुस्तके मग दाखवून द्या त्यांना किसमे कितना है दम. भेटूयात पुढील लेखात. धन्यवाद. 🙏
✏️लेखक - सुरज
"Hardwork on your smartness"
Telegram- https://t.me/mpscexpected
No comments:
Post a Comment