💠Lockdown चा परिणाम mpsc च्या cutoff वर होईल का? तर हो. नक्कीच होईल. हा cutoff नेहमीपेक्षा कमी लागेल कि जास्त तर तर याबाबत सविस्तर पाहू.
(त्याआधी सर्वांच्या मनात प्रश्न आहे कि आधीच निघालेल्या ऍड चे mpsc चे पेपर 2020 मध्ये होणार का? तर मी भोळी आशा कोणालाही दाखवत नाही माझा विश्वास प्रॅक्टिकल गोष्टींवर आहे त्यामुळे मी आयोगाला माहितीच्या अधिकारा अंतर्गत परीक्षा होणार कि नाही आणि झाल्याचतर सविस्तर माहिती द्यावी असा RTI टाकला आहे लवकरच याबाबत update आपल्या t.me/Mpscexpected या telegram चॅनेल वर टाकेल ).
तर आता पाहू cutoff नेहमीपेक्षा कमी लागण्याची कारणे काय असू शकतात.
• सर्वात महत्वाचे कारण हे कि मुलांकडे त्यांची सर्व पुस्तके उपलब्ध नाहीत कि ज्यामुळे त्यांना revise करणे सोपे जाणार होते.
•लायब्ररी एवढाच अभ्यास घरीपण होणे कठीण आहे.यामुळे सर्वांच्याच अभ्यासावर परिणाम होवू शकतो.
•ग्रुप डिस्कशन चा फायदा आता घेता येणार नाहीये.
•जूने विद्यार्थी कि ज्यांच्यामुळे cutoff जास्त जात असतात ते आता घरी असल्याने आणि खूप दिवस अभ्यास करूनही पोस्ट नसल्याने घरच्यांचे pressure या काळात वाढू शकते त्याचा परिणाम अभ्यासावर होऊ शकतो.
आता पाहू दुसरी बाजू, cutoff वाढण्याची कारणे काय असू शकतात.
•सर्वात महत्वाचे आणि एकमेव कारण म्हणजे येणारा काळ हा सर्वांसाठीच कठीण असल्याने तसेच स्पर्धा परीक्षेची अनिश्चितता वाढल्याने हाच तो शेवटचा attempt या जिद्दीने पेटून उठलेल्या विद्यार्थ्यांमुळे cutoff जास्त जाऊ शकतो.
वरील ज्या category मध्ये मुले जास्त असतील त्याप्रमाणे cutoff लागतील. मला आत्ता तरी दोन्ही category मध्ये 50:50 हा ratio दिसत आहे येणाऱ्या काळात कदाचित दुसऱ्या category मधील विद्यार्थी वाढतील.
आणखी एक महत्वाची गोष्ट ही कि ज्यांच्याकडे कमी पुस्तके आहे तर मार्क्स कमी पडणार आणि जास्त पुस्तक असणाऱ्यांना जास्त मार्क्स पडणार अस किमान पूर्व परीक्षेला तरी होणार नाहीये कारण पूर्व परीक्षेला मर्यादित पुस्तकातूनच प्रश्न पडतात व ती सर्वांकडे आहेत. भेटूयात पुढील लेखात. धन्यवाद.🙏
✏️लेखक - सुरज
"Hardwork on your smartness"
No comments:
Post a Comment