Monday, 18 May 2020

कुत्रा आणि ससा... !!!

💠जंगला मध्ये एकदा मालक आणि त्याचा कुत्रा दिवसभर फिरल्यावरते संध्याकाळी घरी येतात तेंव्हा कुत्रा मालकाला म्हणतो मला खूप भूक लागलीये तर मला काहीतरी खायला द्या. त्यावर मालक म्हणतो माझ्याकडे आत्ता तुला देण्यासाठी काहीच शिल्लक नाहीये तेव्हड्यात त्याला एक ससा समोरील झुडपात जाताना दिसतो तेंव्हा मालक कुत्र्याला म्हणतो ते बघ तुझे जेवण आले जा आणि पकड त्याला. त्यावेळी कुत्रा सशाला पकडण्यास धावतो तेंव्हा सशाला याची चाहूल लागते व तोही जोराने पळायला लागतो. कुत्रा खूप लांब पर्यंत सशाचा पाठलाग करतो परंतु शेवटी ससा काही त्याला सापडत नाही मग दमून कुत्रा पुन्हा मालकाकडे येतो तेंव्हा मालक त्याला म्हणतो एवढासा ससा तुला सापडला नाही. त्यावर कुत्रा उत्तर देतो हो नाही  सापडला कारण मी त्याच्यामागे माझे फक्त पोट भरण्यासाठी धावत होतो परंतु ससा पुढे धावत होता तो त्याचा जीव वाचविण्यासाठी त्यामुळेच माझ्यापेक्षा तो सरस ठरला.माझ्यासमोर पर्याय होता जरी आज नाही मिळाले जेवण तरी काय मरत नाही उद्या मिळेलच कि.परंतु सशा समोर पर्याय नव्हता तो सापडला कि मरणारच होता त्यामुळेच त्याचे प्रयत्न माझ्यापेक्षा जास्त होते.
Mpsc च्या मुलांनो आजपर्यंत आपण (गोष्टीतील) कुत्र्याच्या भूमिकेत होतो म्हणजेच आपण केवळ भूक भागावी यासाठी mpsc च्या मागे पळत होतो जरी नाही परीक्षा पास झालो तरी पुढच्या वर्षी आहेच कि पुन्हा परीक्षा याच विचाराने आजपर्यंत चालत आलो. म्हणजेच या गोष्टीतील कुत्र्याप्रमाणे प्रयत्न करू पण जरी नाही मिळाले जेवण तरी मरणार नाहीये उद्या मिळेलच कि जेवण म्हणजेच पोस्ट. परंतु आज आणि भविष्यात आपल्या समोर अशी परिस्तिथी आलीये कि आपल्याला लवकरात लवकर गोष्टीतील कुत्र्याच्या भूमिकेतून सशाच्या भूमिकेत यायचा आहे आता केवळ भूक म्हणून नाही तर जीव वाचविण्यासाठीच प्रयत्न करायचे आहेत.भेटूयात पुढील लेखात.धन्यवाद 🙏
✏️लेखक - सुरज 

"Hardwork on your smartness"

No comments:

Post a Comment