💠.... तर संयुक्त पूर्व परीक्षा 2020 Fail होणाऱ्यांना होऊ शकतो खूप जास्त फायदा...!!!
या पोस्ट मध्ये मी कोणालाही Negative अथवा Positive करण्याचा प्रयत्न करत नाहीये असाही माझा Positive/Negative या पेक्षा Practical गोष्टींवर जास्त विश्वास आहे.येथे मी केवळ एक ANALYSIS मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
तर...झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल या महिना अखेर पर्यंत लागू शकतो कदाचित लवकरही...निकाल लागेपर्यंत 30 मार्क्स असो वा 60 मार्क्स असो सर्वांनी मराठी इंग्लिश चा अभ्यास केला पाहिजे,यात काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
Result लागल्यानंतर पास होणाऱ्या विद्यार्थांची संख्या 12000 पर्यंत असू शकेल.हे पास झालेले विद्यार्थी डिसेंबर/जानेवारी पर्यंत मुख्य परीक्षेचा अभ्यास करतील mostly मराठी/इंग्लिश/कायदे जे की संयुक्त पूर्व परीक्षेला नाहीत...!!! आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे जर 2021/2022 च्या दोन वेगळ्या परीक्षा घ्यायच्या असतील तर एक परीक्षा लवकर घ्यावी लागेल आणि दुसरी नेहमीप्रमाणे. त्यामुळे समजा 2021 चा संयुक्त पूर्व परीक्षा पेपर जानेवारी/फेब्रुवारी मध्ये झाला तर जे विद्यार्थी 2020 च्या मुख्य ची तयारी करत आहेत त्यांना पुन्हा 2021 च्या पूर्व चा अभ्यास करण्यास किती वेळ मिळेल....???आणि हे सर्व विद्यार्थी मुख्य दिलेले म्हणजे serious असणारे विद्यार्थी आहेत...!!!..थोडक्यात सांगायचे झाल्यास संयुक्त पूर्व 2021 चा Cutoff नेहमीपेक्षा कमी लागेल, जर 2 परीक्षा वेगळ्या झाल्या तर...आणि याचा फायदा जे विद्यार्थी 2020 ची परीक्षा Fail होतील त्यांना होऊ शकतो कारण त्यांना पूर्व चा अभ्यास करण्यास किमान 3 ते 4 महिन्याचा अवधी मिळेल व ज्यांनी मुख्य दिली आहे त्यांना एक ते दीड महिना..!!!
त्यामुळे ज्यांना 2020 च्या संयुक्त पूर्व परीक्षेत एकाही पोस्ट ची प्री पास करता येणार नाही, त्यांनी संधीचा योग्य फायदा घेतल्यास 2021 मधील तीनही पोस्ट च्या प्री पास करता येतील तेही नेहमी लागणाऱ्या cutoff पेक्षा कमी मार्क्स मध्ये...!!!! धन्यवाद 🙏
✍ Er SurajDeokar