💠 What is self belief ?
सध्या चालू असलेल्या IPL 2021 च्या हंगामात कालच CSK ची टीम Playoff साठी Qualify होणारी प्रथम टीम ठरली...
या अनुषंगाने थोडा मागील गोष्टींचा आढावा घेऊयात..
IPL 2020 मध्ये म्हणजे मागील हंगामात CSK टीम तळातून दुसऱ्या क्रमांकावर होती त्यावेळी या टीम वर खूप दिग्गज मंडळींनी टीका केली विशेषतः धोनी वर...
त्यानंतर यावर्षीची IPL स्पर्धा घोषित झाली आणि Predictor स्वतःचे prediction करू लागले,कोणत्याही Predictor ने यावर्षी ही टीम Playoff साठी Qualify होईल असा विश्वास दाखविला नाही उलट टीम चा रँक हा गेल्यावेळी प्रमाणे तळातच राहील असेही सांगितले...(वरील फोटो मध्ये पाहू शकता).
....आणि आज टीम ही टॉप रँक वर सर्वात आधी Qualify झाली आहे..विशेष म्हणजे गेल्यावेळी तळाला असताना जे players टीम मध्ये होते 90% तेच player आजच्या टीम मध्येही आहेत..तर हे शक्य झाले कसे...?
स्वतःवरील विश्वास आणि योग्य मानसिकता...!!!
स्पर्धापरीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे.प्रत्येकाचा भूतकाळ हा बऱ्यापैकी अपयशाने भरलेलाच असतो.लोकही आपल्याकडे त्याच दृष्टिकोनातून पाहत असतात आणि आपले भविष्य काय असू शकते याबाबत अंदाज बांधत असतात.लोक काय म्हणतात ही गोष्ट आपण स्वतःवरील विश्वास ढळू न देता आपल्या मानसिक पातळीवर कशाप्रकारे हाताळतो आणि आपले काम करत राहतो यामध्येच आपले भविष्यातील यश अपयश अवलंबून असते.
शेवटी धोनी म्हणतो त्याप्रमाणे "Take a one match at a time".... एका वेळी एकाच मॅच चा विचार करा...
अभ्यास करतानाही एका वेळी जो विषय समोर असेल त्याचाच विचार करावा, न की पास/ नापास/भूत/भविष्य यांसारख्या इतर गोष्टींचा....!!! धन्यवाद 🙏
✍ Er SurajDeokar
No comments:
Post a Comment