💠प्रिय विद्यार्थी मित्रानो आत्ता हातातील सर्व काम सोडून ही पोस्ट वाचा आणि नीट समजावून घ्या तुमच्या अभ्यासात चमत्कार घडेल.
पोस्ट चे Title वाचून नक्कीच तुमच्या मनात कुतुहूल निर्माण झाले असेल. जेंव्हा मी 80/20 Rule नावाचे पुस्तक पाहिले तेंव्हा माझ्याही मनात असेच कुतुहूल निर्माण झाले होंते. आपल्यासारख्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थीनसाठी जर हा Rule नीट समजला तर ती एक मोठी संजीवनी ठरणार आहे. जागतिक स्तरावरील खूप मोठे लोक याचा वापर दैनंदिन जीवनात करून यशस्वी झाले आहेत. तर चला पाहुयात काय आहे हा 80/20 Rule?(हा rule मी अभ्यासाच्या दृष्टीकोनातुन समजावून सांगत आहे.परंतु हा आयुष्यातील प्रत्येक गोष्टीत लागू होंतो.)
असा समजा कि तुमच्यासमोर कोळंबे सरांचे राज्यघटनेचे पुस्तक आहे (सर्वांचा आवडता विषय आणि पुस्तक 😄) जर त्याची index पाहिलीत तर त्यात खूप सारे Topic आहेत हे आपल्याला माहित आहे.आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना हे पण माहित आहे कि कोणत्या टॉपिक वर नेहमी प्रश्न येतात.म्हणजे असा समजा कि पुस्तकात 100 टॉपिक असतील तर त्यातील 80 टॉपिक असे असतील कि त्यावर परीक्षेत फक्त 20% प्रश्न विचारतील आणि पुस्तकात 20 टॉपिक असे असतील कि ज्यावर परीक्षेत 80% प्रश्न विचारतील.(हे काय होता बे काहीच कळलं नाही)काळजी नका करू पुन्हा सांगतो.आपल्या संयुक्त पूर्व परीक्षेचे उदाहरण घेऊ ज्यात राज्यघटनेचे दहा प्रश्न असतात.तर या Rule नुसार कोळंबे सरांच्या बुक मधील 80 टॉपिक असे असतील कि ज्यामधून संयुक्त परीक्षेत केवळ 2 प्रश्न येतील आणि 20 टॉपिक असे असतील ज्यामधून संयुक्त परीक्षेत 8 प्रश्न येतील.(समजलं बाबा एकदाचा)तर झाला आपल काम आपल्याला एवढच शोधायचा आहे कि ते 20% वाले टॉपिक कोणते आणि 80% वाले कोणते.जसे कि घटनादुरुस्ती, सरनामा हे 20 % वाले टॉपिक आहेत व दबावगट, निवडणूक प्रक्रिया, राजकीय संघटना हे टॉपिक 80% मध्ये जाणार.तर आता हे कसे ठरवणार कि कोणते 80 व कोणते 20 तर त्यासाठी सर्वात महत्वाचा source आहे मागील आयोगाच्या प्रश्नपत्रिका.यामधून सहज 20% वाला टॉपिक कोणता व 80% वाला कोणता हे समजून येईल.आपला पूर्ण फोकस हा या 20% टॉपिक वर पाहिजे जेणेकरून कमीवेळेत जास्त वेळा वाचून होईल आपल्याला 100% टॉपिक वर काम करण्याची गरज नाही कारण मेरिट हे 50% च्या आसपास लागते. असेच सर्व विषयांचे करा.जागतिक पातळीवर या Rule ला खूप महत्व आहे.यावर अनेक पुस्तके पण निघाली आहेत वेळ मिळाल्यास जरूर वाचावी.Smartwork करायला शिकले पाहिजे आणि आपण ते शिकत आहात याची खात्री आहे मला शेवटी आपले स्लोगन पण हेच सांगते @mpscexpected- "Hardwork on your Smartness"
धन्यवाद 🙏
✏️लेखक - सुरज
काही सूचना असल्यास Comment मध्ये कळवा.🙏
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन sir
ReplyDeleteधन्यवाद.
DeleteThanks sir.
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete