Monday, 18 May 2020

कोळंबे LOCKDOWN लक्ष्मीकांत

💠Mpsc करणारे खूप विद्यार्थी प्रामुख्याने राज्यघटना या विषयासाठी कोळंबे सरांचे पुस्तक वापरतात.राज्यसेवा अथवा संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी कोळंबे सरांचे पुस्तक नक्कीच sufficient आहे त्यात वाद असण्याचे कारण नाही. परंतु मुख्य परीक्षेचा विचार कराल तर एक एक मार्क खूप महत्वाचा असतो राज्यसेवेत तर एक मार्क ने उपजिल्हाधिकाऱ्याचा तहसीलदार होऊ शकतो. तसेच संयुक्त मुख्य परीक्षेतही निवड झालेल्या विद्यार्त्यांचा स्कोर हा अगदी काठावरतेच असतो म्हणजेच जर cutoff 140 लागला तर निवड झालेल्या  जास्तीतजास्त विद्यार्थ्यांचा स्कोर हा 140 ते 142 दरम्यान असतो. म्हणजेच जर एक दोन मार्क्स कमी पडले तर डायरेक्ट लिस्ट च्या बाहेर. तर सांगायचा उद्देश हाच कि मुख्य परिक्षेत कोळंबे ऐवजी लक्ष्मीकांत पुस्तक वापरले तर नक्कीच मार्क्स वाढण्यामध्ये याचा फायदा होईल.सध्याच्या lockdown चा काळ म्हणजे जुन्या पुस्तकातून नवीन standard पुस्तकाकडे वळण्याचा सुवर्णकाळ आहे. कारण आत्ता कोणताही अभ्यासक्रम एवढ्याच दिवसात पूर्ण करण्याचे pressure नाहीये आणि परीक्षेची तारिखपण फिक्स नाहीये म्हणून आपल्याला अभ्यासात थोडा बदल करण्यास वाव आहे. आत्तापासूनच लक्ष्मीकांत वाचायला चालू केलेत तर मुख्यला नक्कीच फायदा होईल Aso सारख्या पोस्ट ला तर मुख्य पेपर 2 मध्ये जवळपास 60 मार्क्स ला राज्यघटना आहे. Psi चा पेपर 2 तर कायद्याशी संबंधित असल्याने आणि यातील राज्यघटना यावरील प्रश्न मध्यम ते उच्च दर्जाचे असल्याने येथे नकीच लक्ष्मीकांत चा उपयोग होईल.STI साठी तर कदाचित gamechanger ठरु शकेल हे पुस्तक कारण मुख्य मध्ये जवळपास फक्त 10 प्रश्न राज्यघटनेवर असतात. परंतु sti मुख्य पेपर 2 चा दर्जा पाहिलात तर एक गोस्ट लक्षात येईल कि अर्थशास्त्र आणि इतिहास या विषयात lead घेणे अवघड आहे. आणि पुस्तकांचा विचार केलात तर बाकी सर्व विषयांना सर्व जण सारखीच पुस्तके वाचणार आहेत राहतो विषय राज्यघटनेचा तर इथे एकतर कोळंबे किंवा लक्ष्मीकांत. शक्य असल्यास english मधील लक्ष्मीकांत वाचावे. जरी आत्ता hardcopy नसेल तर pdf read करा एक दोन reading करून घ्या lockdown उठल्यावर hardcopy मिळेलच. English मध्ये पुस्तक आहे म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नाहीये कारण यात governer म्हणजे राज्यपाल असे महत्वाचे शब्द कळले म्हणजे झाले. एकदा फक्त तुम्ही सुरुवात करा जमेल सर्व हळू हळू सध्या भरपूर वेळ आहे आपल्याकडे. एखाद्याला अगदीच कळतच नसेल english तर त्याने लक्ष्मीकांत चा मराठी अनुवाद केलेले ksagar पुस्तक वाचावे(इथे english जमणार नसेल तर मुख्य परीक्षेला english पेपर कसा देणार आहात?) शेवटी एक लक्षात घ्या जर तुम्ही लक्ष्मीकांत english मधील वाचाल तर तुम्ही क्लास 3 पासून class1, state पासून central कोणतीही exam द्या जेथे राज्यघटना विषय येईल त्यावेळी त्यातील 99% प्रश्न यातूनच येतील. मग लागा तयारीला आणि करून टाका पाठ. भेटूयात पुढील लेखात. धन्यवाद🙏
✏️लेखक - सुरज 

"Hardwork on your smartness"

3 comments:

  1. laxmikant book badal khup chan explain kele sir tumhi

    ReplyDelete
  2. Aaj paryant ase explanation kothech milale navhte.khup dhanywad

    ReplyDelete