Wednesday, 22 April 2020

MPSC करताना या गोष्टी माहित असाव्याच लागतील.... !!!!


💠आपल्याला कोणती पोस्ट हवी आहे हे माहित असायलाच हवे.
🔸तयारी करत असलेल्या पोस्ट ची ताकत, कर्तव्य माहित असावे. 
🔸सर्व विषयांची क्रमिक पुस्तके पाठच असावीत.
🔸किमान science साठी तरी NCERT  वाचलेले असावे. 
🔸इतिहासाची जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत. 
🔸अर्थशास्त्र व राज्यघटना कमीत कमी पुस्तके वाचावीत. 
🔸चालूघडामोडी प्रत्येक महिन्याचे कोणतेही एक मासिक वाचावे. व परीक्षेआधी येणारे वार्षिकी पण वाचावे. 
🔸भूगोल विषयासाठी क्रमिक पुस्तके सर्वात महत्वाची आहेत फक्त महाराष्ट्राचा भूगोल एखाद्या रेफेरन्स बुक मधून करावा. 
🔸राज्यसेवेसाठी संकल्पना महत्वाच्या तर संयुक्त परीक्षेसाठी पाठांतर महत्वाचे आहे. 
🔸काय वाचावे यापेक्षा काय वाचू नये हे समजणे महत्वाचे. 
🔸पुस्तकांच्या सॉफ्टकॉपी वाचण्यापेक्षा हार्डकॉपी वाचाव्यात. 
🔸राज्यसेवेची अभ्यास करण्याची पद्धत आणि संयुक्त परीक्षेची अभ्यासाची पद्धत वेगळी आहे. 
🔸राज्यसेवा पूर्व देण्याआधी मेन्स चा अभ्यास किमान एकदा तरी केलेला असावा.
🔸जर क्लास 2 चीच पोस्ट घ्यायची असेल व physical standard बसत असतील तर PSI पोस्ट घेणे कधीही चांगले. 
🔸ASO पोस्ट घेण्याची इच्छा असेल तर कायम मुंबई मध्ये नोकरी करण्याची आपली तयारी आहे का हे पाहावे. 
🔸PSI च्या ट्रेनिंग पिरियड मध्ये पुढील पोस्ट साठी अभ्यासाला खूप कमी वेळ मिळतो व दिवसभर थकल्यामुळे अभ्यास करण्याची  मानसिकता नसते. 
🔸पोस्ट घेऊन पुढील अभ्यास करण्यासाठी STI ही पोस्ट छान आहे. 
🔸वरील सर्व पॉईंट्स बाबत अजून सखोल लिहावे असे वाटत असल्यास comment मध्ये कळवा. धन्यवाद 🙏

✏️लेखक - सुरज 

3 comments:

  1. Thanks Sir for valuable guidance

    ReplyDelete
  2. Hello sir,
    tumhi khup changlyaprakare sarv goshthi sangitle aahet. T
    hank you sir.

    ReplyDelete