Wednesday, 25 November 2020

MPSC चे सराव पेपर घेताना कोणत्या गोष्टी पाहायला हव्या ?

💠 MPSC चे सराव पेपर घेताना कोणत्या गोष्टी पाहायला हव्या ?

✍सुरज देवकर

या लेखामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सराव पेपर घेताना कोणत्या गोष्टी पाहायला हव्या हे पाहू.

मागील पेपर चे Analysis केले असता आयोगाच्या पेपर मध्ये खालील गोष्टी दिसून येतात.

👉 कोणताही सेट असेल (A,B,C,D) तरी प्रश्नांचा क्रम असाच पाहायला मिळतो.चालू घडामोडी(1-15),राज्यघटना(16-25),
इतिहास(26-40),भूगोल(41-55),
अर्थशास्त्र(56-70), विज्ञान (71-85),अंकगणित/बुद्धिमत्ता(86-100)
👉राज्यघटना विषयाचे 10 प्रश्न आणि बाकी विषयांचे 15 प्रश्न.
👉प्रश्न जरी मराठीत असेल तरी उत्तराचे पर्याय अ, ब, क, ड असे नसून ते a,b,c,d असे असतात.
👉भूगोल विषयाचे जास्त प्रश्न सोपे,इतिहास आणि विज्ञानाचे अवघड.
👉राज्यघटनेचे प्रश्न सोपे परंतु Multiple option असणारे वेळखाऊ.
👉इतिहासाचे प्रश्न one-liner.
👉Physics,chemistry पेक्षा Biology वर जास्त प्रश्न.
👉अर्थशास्त्र Medium level जास्त प्रश्न.
👉चालू घडामोडी जास्त प्रश्न medium level आणि one-liner.
👉 अर्थशास्त्र मध्ये एक ते दोन प्रश्न योजनांवर आधारित.(देसले पार्ट 2 मधील)
👉अंकगणित/बुद्धिमत्ता वेळखाऊ प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.परंतु प्रश्न सोपे.
👉Biology चे बऱ्यापैकी प्रश्न वाचनात न आलेल्या टॉपिक वरील.

तर सराव पेपर घेताना वरील किती गोष्टी त्यात Follow केलेल्या दिसतात त्यानुसार पेपर घ्यावेत.उगी फ्री मध्ये मिळतायत म्हणून कोणतेही पेपर घेऊन स्वतःचा वेळ आणि आत्मविश्वास घालवू नये.आयोग पेपर सर्व गोष्टींचा विचार करून सेट करत असते जसे की इतिहास,विज्ञान वरील प्रश्न अवघड काढत असेल तर पेपर maintain करण्यासाठी भूगोल,राज्यघटना वरील प्रश्न सोपे काढते जेणेकरून मेरिट हे एका ठराविक limit मध्ये लागेल,जास्त ही नाही आणि कमी ही नाही. एका क्लास चे 2 पेपर सोडवून त्या दोन्ही मधील मार्क्स मध्ये खूप जास्त फरक दिसत असेल तर समजावे आपण चुकीचे पेपर सोडवत आहोत...

मी स्वतः काही पेपर वरील सांगितल्याप्रमाणे आयोगाच्या धर्तीवर सेट करण्याचा प्रयत्न केला आहे.पेपर साठी खूप जास्त मेहनत लागल्याने पेपर मोफत देता येऊ शकत नाहीत तरीही किंमत जास्तीत जास्त मुले घेऊ शकतील अशीच ठेवली आहे.दुसऱ्या क्लास चे पेपर मोफत मिळत असल्यास जरूर घ्यावे काही हरकत नाही परंतु वर सांगितलेल्या गोष्टी तपासून पहाव्यात.पुढील लेखात राज्यसेवा विषयी पाहू.धन्यवाद🙏

👉पेपर PDF  खालील लिंक वरून Download करू शकता..⬇️⬇️



1 comment: