Sunday, 24 May 2020

राज्यसेवा देणार असाल तर हे वाचा... !!!

💠राज्यसेवा देणाऱ्या मुलांनी एक गोष्ट पक्की मनात ठेवली पाहिजे कि पूर्व परीक्षेआधी मुख्य परीक्षेचा अभ्यास हा केलेलाच पाहिजे. मुख्य परीक्षेचा अभ्यास न करता पूर्व परीक्षा पास झालात तर कदाचित तो तुमच्यासाठी मोठा धोका ठरु शकतो कारण ज्यावेळी तुम्ही मुख्यचा अभ्यास नसताना पूर्व पास कराल तर त्याच वेळी combine चीही  पूर्व तुम्ही पास झाला असाल आणि राज्यसेवा मुख्य व combine मुख्य यामध्ये थोड्याच दिवसांचे अंतर असल्याने आणि राज्यसेवा मुख्य चा syllabus मोठा असल्याने combine मुख्य कडे तुमचे दुर्लक्ष होईल. यामुळे राज्यसेवा मुख्य मध्ये सर्व syllabus पहिल्यांदा वाचत असल्याने व combine मुख्य कडे दुर्लक्ष झाल्याने दोन्हीकडे खूप मोठे नुकसान होऊ शकते आणि तुमच्याच बरोबरच्या मित्राची तुमच्याप्रमाणे राज्यसेवा मुख्यचा अभ्यास नसेल आणि तो पासही झाला नाही परंतू  तो combine पूर्व पास झाला तर त्याला  पूर्ण फोकस combine मुख्य वर करता येईल आणि syllabus कमी असल्याने पासही होऊन जाईल. 
सांगायचा मुद्दा हा कि फक्त राज्यसेवा पूर्व पास होण्यात काही अर्थ नाही मुख्य पण पास झालाच पाहिजे कारण यासाठी तुम्ही combine ची कुर्बानीच देत असता. अनेक मुल असे आहेत कि त्यांची राज्यसेवा करत combine पण निघालीये कारण त्यांचा पूर्व आधीच मुख्यचा पण अभ्यास झाला असल्याने combine मुख्यचा ही अभ्यास करणे त्यांना manage झाले. 
राज्यसेवा पूर्व मध्ये पेपर 1 मध्ये 100 प्रश्नांपैकी 30% प्रश्न हे डायरेक्ट पुस्तकातून येतील जे तुम्ही confidently सांगाल उत्तर हेच आहे. 65% प्रश्न मात्र जे तुम्ही वाचले आहे त्याचा वापर करून आणि लॉजिक व एलिमिनेशन method याचा वापर करून सोडवावे लागतात.राहिलेले 5% प्रश्न हे syllabus च्या बाहेरील असतात असा म्हटलं तरी चालेल. 
राज्यसेवा पूर्व पास होण्यासाठी तुम्हाला पेपर 2 म्हणजे CSAT या विषयात कमीतकमी 100 मार्क्स घ्यावेच लागणार आहेत. ( CSAT वर पुढील लेखात सविस्तर सांगेल )फक्त CSAT च्या जोरावर पूर्व पास होता येत, परंतू फक्त GS च्या जोरावर पास होणारे खूप कमी असतात त्यांना रजनीकांत म्हटलं तरी चालेल. CSAT ची भीती आणि अभ्यास यावर सविस्तर आपल्या @mpscexpected या टेलिग्राम चॅनेल वर सांगेल. भेटूयात पुढील लेखात.धन्यवाद 🙏
✏️लेखक - सुरज 
(admin @mpscexpected टेलिग्राम चॅनेल)
"Hardwork on your smartness"

3 comments: